You are currently viewing रोजच असतो कन्या दिन

रोजच असतो कन्या दिन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*रोजच असतो कन्या दिन*

 

कन्या दिनाच्या गप्पा मोकळ्या

मारायची मातोश्री शेजारणीशी

जुनाट मेतकूट *अनेक वर्षाचे*

उरकून बसल्या मासिक भिशी

1

पिऊन थंडगार पाणी विहिरीचे

शेजारीण बसली बाता कुटत

सावल्या फिरून माघारी गेल्या

तरीही नव्हत्या तिथून उठत

2

आवाज ऐकून गाडी आल्याचा

आवरत घेतला आजीने विषय

लोचट शेजारीण तरी बडबडते

मागेना बदलायला गप्पा आशय

3

निवृत्त असून आजी आमची

पेन्शन देतेय विशेष शाळेला

किती घडविले तिनै विद्यार्थी

धावत येतात अडी नडीला

4

नसून कन्या पोटची तिजला

शेजारणीत शोधते ती मुलीला

कशी समजणार व्यथा कुणाला

*जन्म मातेचा हवा घ्यायला*

5

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा