*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.कविता किरण वालावलकर लिखित भावस्पर्शी काव्यरचना*
*भावपूर्ण श्रद्धांजली*
अजित दादा गेले
याचे दुःख साऱ्यांना
पण नका विसरू तुम्ही
कधी त्या चार जणांना
कर्तव्य बजावत होते
अजित दादांसोबत
मोजावी लागली त्यांना
पहा जीवाची किंमत
वैमानिक सुमित
सहवैमानिक शांभवी
अशीच जिद्द कर्तव्याची
प्रत्येक व्यक्तीमध्ये हवी
विदिप जाधव होते
वैयक्तिक सुरक्षा अधिकारी
मृत्यूलाही कवटाळण्याची
जणू दाखवली तयारी
पिंकी माळी यांनी बजावले
नेटाने असे काही कर्तव्य
फिके पडले जणूकाही
सारे आकाश ते भव्य
सौ कविता किरण वालावलकर
कर्नाटक , दावणगिरी
