गझल सप्ताहानिमित्त
या पूर्वीच्या एल्गार गझल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष – डॉ.दिलीप पांढरपट्टे
स्थायी गझलकार मग प्रशासक
==============
कविवर्य स्व.सुरेश भटांमुळे अनेक चांगल्या लोकांच्या भेटी झाल्यात. त्यांच्याबरोबर सतत राहत असल्यामुळे व अनेकदा त्यांचा मुक्काम माझ्या अमरावतीच्या तपोवन येथील घरी असल्यामुळे खूप लोक परिचयाचे झालेत. त्यांच्यामुळे काही सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या पण भेटी झाल्यात. ती यादी फार मोठी आहे .अमरावतीला विभागीय आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झालेले श्री दिलीप पांढरपट्टे यांचा माझा परिचय कविवर्य सुरेश भट व गझल सम्राट श्री भीमराव पांचाळे यांच्यामुळे झाला. अमरावती विभागाला स्व. सुरेश भटांवर नितांत प्रेम करणारे विभागीय आयुक्त अमरावती विभागाला लाभले होते हे खरंच खरोखरच आमच्या साहित्यिक मित्रमंडळीला आनंदाची पर्वणी होती.
.प्रत्येकाला एक छंद असतो आणि तो छंद नकळत विकसित होत असतो. आय.ए.एस.अधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे हे उत्कृष्ट सनदी अधिकारी होतेच. आता ते सेवानिवृत्त झाले असले तरी पण गझलेच्या क्षेत्रात त्यांचा चांगला नावलौकिक आहे .कविवर्य सुरेश भट भीमराव पांचाळे आणि दिलीप पांढरपट्टे हे गझलेचे समीकरण आहे .खरं म्हणजे सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या मागे कामांचा खूप व्याप असतो . पण या शासकीय व्यापातून स्वतःच्या आवडीसाठी स्वतःच्या छंदासाठी प्रत्येक जण जसा जमेल तसा वेळ काढीत असतो.पांढररपट्टेसाहेबांनी आपला आवडीचा भाग म्हणून गझलेला समर्पित केले आहे .कविवर्य स्व.सुरेश भटांच्या तोंडून अनेक वेळा पांढरपट्टे साहेबांचे नाव निघायचे . मागे काही वर्षांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील गझलनवाज श्री भीमराव पांचाळे यांच्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील आष्टगाव या त्यांच्या गावाला अखिल भारतीय गझल संमेलन आयोजित केले होते . आमचे मित्र व त्या भागाचे तत्कालीन आमदार व माजी कृषी मंत्री व विद्यमान खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्याबरोबर मी या कार्यक्रमाला गेलो होतो . पांढरपट्टेसाहेब तेव्हा मुंबईला कार्यरत होते .खरं म्हणजे मुंबईला रमलेली माणसं अमरावतीला यायला उत्सूक नसतात.किमान नागपूर मिळावे अशी प्रत्येक अधिका-यांची इच्छा असते . अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील गझलनवाज भीमराव पांचाळ यांचे आष्टगाव हे छोटेसे गाव .मोर्शीजवळ असलेले.त्या गावांमध्ये गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी आपले सगळे गझलेचे गणगोत गोळा केलेले होते .भीमरावांचे गणगोत म्हणजे गझल लिहिणारे .गझलेवर प्रेम करणारे सर्वजण त्यात आले .या कार्यक्रमाला दिलीप पांढरपट्टे साहेब मुंबईवरून स्वतःच्या वाहनाने येऊन आवर्जून उपस्थित राहिले होते. गझलेचा कार्यक्रम आणि पांढरपट्टे साहेबांची उपस्थिती हे समीकरण जुळून आलेले आहे.
मागे भीमरावांनी नवी मुंबईच्या परिसरामध्ये अखिल भारतीय गझल संमेलन घेतले होते. त्यावेळेस साहेब धुळ्याला जिल्हाधिकारी होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या मागे कामाचा किती व्याप असतो .पण ते सांभाळूनही त्यांनी नवी मुंबईच्या गझल संमेलनाला आवर्जून उपस्थिती लावली होती.तेव्हा मी त्यांना भेटलो.मी स्व.सुरेश भटांवर कॉफी टेबल बुक तयार करीत आहे .त्याची प्रत मी तेव्हा त्यांना दाखविली आणि त्यांनी तोंड भरून माझ्या या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या आणि हे कॉफी टेबल बुक चांगले तयार केले याबद्दल माझे अभिनंदनही केले .
मागे एकदा असेच मी नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे एका कार्यक्रमाला गेलो होतो .सटाण्यावरून धुळे फारच जवळ होते . पांढरपट्टेसाहेब तेव्हा धुळ्याला जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. माझा सटाण्याचा कार्यक्रम संपल्यानंतर मी मुद्दाम धुळ्याला गेलो .साहित्यिक विश्वातील माणसं जेव्हा सनदी अधिकारी होतात तेव्हा प्रशासनाला भावनेची आत्मियतेची जिव्हाळ्याची चांगली जोड मिळते. मी धुळ्याला गेल्यानंतर साहेब व्यस्तच होते .परंतु आपल्या व्यस्त कार्यक्रमातूनही त्यांनी माझ्यासाठी वेळ काढला. चांगले आदरतिथ्यही केले .
त्यांच्या रूपाने अमरावती विभागाला कुशल प्रशासक मिळालेला होता.साहेब अमरावती येथे विभागीय आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर बरेच वर्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी कार्यरत होते. साहित्याच्या क्षेत्रात आपला नावलौकिक वाढविणारा गजलेवर मनापासून प्रेम करणारा माणूस महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर सदस्य म्हणून विराजमान होतो ही आमच्यासारख्या आय ए एस च्या क्षेत्रात काम करणाऱ्या व गजलेवर प्रेम करणाऱ्या साहित्यिक व साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व साहित्यिकांसाठी व रसिकांसाठी तसेच जनतेसाठी अतिशय आनंदाची बाब आहे .
मागे दिनांक 22 मार्च 2025 रोजी श्री दिलीप पांढरपट्टे साहेब सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे एका पुस्तक प्रकाशन निमित्त आले होते. श्री शिवाजी कॉलेज बार्शी येथे कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्र चालविण्यात येते. या महाविद्यालयात माझ्या बऱ्याच स्पर्धा परीक्षा कार्यशाळा झाल्या आहेत. या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री शेख यांना श्री दिलीप पांढरपट्टेसर हे बार्शीला येणार आहेत असे माहीत पडताच त्यांनी श्री दिलीप पांढरपट्टे यांना संपर्क केला आणि आपल्या श्री शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना निमंत्रण दिले. साहेब सकारात्मक विचारसरणीचे आहेत .त्यांनी ताबडतोब ते निमंत्रण स्वीकारले व श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथील प्राध्यापकांना विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आयोगाचे सदस्य असलेल्या गझलकार श्री दिलीप पांढरपट्टे यांनी बार्शीला येणे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे ही एक ऐतिहासिक गोष्ट. विद्यार्थ्यांना एका मोठ्या कर्तव्यदक्ष सनदी अधिकाऱ्याची या निमित्ताने भेट झाली व त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला ही बाब लाख मोलाची ठरली आहे.
साहित्याच्या क्षेत्रात तसेच प्रशासनाच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेला हा माणूस सकारात्मक विचारसरणी ठेवून काम करीत आहे. लेखन करीत आहे. गझल लिहीत आहे. गझल संमेलनाचे अध्यक्षपद भूषवित आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून स्वागत.
यापूर्वी अकोला येथे झालेल्या एल्गार गझल साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्याच वेळेस ते अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त देखील होते. अकोल्याचे एल्गार गझल साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने दमदार झाले. रसिकांची दमदार उपस्थिती हे या संमेलनाचे वैशिष्ट्य होते. तेव्हाचे पोलीस महानिरीक्षक श्री जयंत नाईक नवरे देखील या संमेलनामध्ये सहभागी झाले होते.
संमेलनानंतर लगेचच श्री दिलीप पांढरपट्टे यांनी अमरावती येथील भव्य अशा श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मध्ये गझल नवाज श्री भिमराव पांचाळे यांचा गजलांचा कार्यक्रम घडवून आणला. या कार्यक्रमाला देखील प्रशासनातील व अमरावती विभागातील प्रशासकीय अधिकारी व रसिकांची नोंदणीय उपस्थिती होती.
साहेब आज जरी सेवानिवृत्त झाले असले तरी गजलेच्या प्रांतात त्यांचा नावलौकिक आहे. लेखक हा कधी सेवानिवृत्त होत नसतो. पद निघून जाते पण कवीपद मात्र कायमचे आपल्याबरोबर राहते. श्री दिलीप पांढरपट्टे यांनी गजलेच्या क्षेत्रात केलेले उल्लेखनीय योगदान महत्त्वाचे आहे. म्हणूनच सर्व गझलप्रेमींनी यावर्षी यापूर्वी झालेल्या गझल संमेलनाचे त्यांना अध्यक्षपद देऊन त्यांचा मानसन्मान केला आहे. अमरावतीला मोर्शी रोडवरील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मध्ये सात व आठ फेब्रुवारीला होणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये ते सहभागी होणार आहेत. अमरावती शहरात त्यांचे एल्गार गझल संमेलनानिमित्त स्वागत आहे.
============== *डॉ.नरेशचंद्र काठोळे* *संचालक डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी.*
अमरावती कॅम्प 9890967003
