रेणुका हॉटेलजवळ झालेल्या अपघातात रशियन पर्यटकांना सामाजिक बांधिलकीचा आधार
सावंतवाडी :
काल सायंकाळी सावंतवाडीतील रेणुका हॉटेलजवळ रशियन पर्यटकांच्या मोटरसायकलचा अपघात झाला. या अपघातात रशियन जोडप्याच्या हाताला, पायाला व खांद्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तत्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच सामाजिक बांधिलकी टीमचे रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी महेश जाधव व मनोज राऊत यांनीही जखमी पर्यटकांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी सहकार्य केले.
वेळीच मिळालेल्या मदतीमुळे जखमी रशियन पर्यटकांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. सामाजिक बांधिलकी टीम व पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी अनर्थ टळल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

