You are currently viewing जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी अमिट शाईची तयारी पूर्ण

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी अमिट शाईची तयारी पूर्ण

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी अमिट शाईची तयारी पूर्ण

७ फेब्रुवारीच्या मतदानासाठी ७५ हजार बाटल्या उपलब्ध
२५ हजार मतदान केंद्रांवर कडक खबरदारी

 

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने अमिट शाईची विशेष तयारी केली आहे. मतदान प्रक्रियेत कोणतीही शंका राहू नये म्हणून मार्कर पेनऐवजी पुन्हा बाटलीबंद अमिट शाई वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी किमान ७५ हजार बाटल्या आयोगाकडे दाखल होणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी दोन बाटल्या देण्यात येणार असून अतिरिक्त साठा बॅकअप म्हणून ठेवण्यात येईल. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी आयोगाकडून कडक उपाययोजना केल्या जात आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा