You are currently viewing कलमठमधून महायुतीला मोठ्या मतांनी निवडून देण्याचे नितेश राणेंचे आवाहन

कलमठमधून महायुतीला मोठ्या मतांनी निवडून देण्याचे नितेश राणेंचे आवाहन

कलमठमधून महायुतीला मोठ्या मतांनी निवडून देण्याचे नितेश राणेंचे आवाहन

कणकवली

कणकवली तालुक्यातील कलमठ येथे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पालकमंत्री तथा मंत्री नितेश राणे यांनी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद निवडणूक लढवली जात असून, जिल्हा परिषदेवर राणे विचारांची सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कलमठ मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी एकाच विचारांचे लोकप्रतिनिधी सत्तेत असणे गरजेचे असून, विकासासाठी आवश्यक निधी मिळवण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. पालकमंत्री म्हणून थेट मदत करण्याची क्षमता आपल्या कडे असून, विरोधकांकडे ती ताकद नसल्याची टीकाही त्यांनी केली.
या सभेला जिल्हा परिषद उमेदवार सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती उमेदवार गुरुनाथ वर्देकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरवडे गावातील सोनू सावंत हे बिनविरोध निवडून आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
७ तारखेला मतदान करून महायुतीला बळ द्यावे, निवडून दिल्यास कलमठ परिसरातील प्रश्न तात्काळ सोडवण्याची जबाबदारी आपण पूर्ण करू, असा विश्वास नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा