*लेखक, कवी, पत्रकार ॲड रुपेश पवार लिखित लेख*
*जरा थांबायला हवे होते*
२८ जानेवारीला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान बारामतीत कोसळले. त्यात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही बातमी कानावर आल्यावर अवघा महाराष्ट्र शोकाकुल झाला. अजित पवारांवर प्रेम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व गर्दी केली. लाखोंचा जनसागर २८ तारखेला बारामतीत वाहू लागला. एकच वादा अजित दादा! अशा घोषणा कानावर येत होत्या. संपूर्ण पवार कुटुंबावर शोककळा पसरली असताना, पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सर्व समर्थकांनी दिलासा दिला काही झाले तरी आम्ही अजित दादा आणि पवार कुटुंबाबरोबर आहोत.
या दुःखाच्या प्रसंगी सर्व पवार कुटुंब एकवटले. त्यांनी या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.
एकमेकांना सांभाळत त्यांनी समर्थक, कार्यकर्त्यांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे सांगितले. हे सर्व पाहून मनाला दुःखही वाटले आणि समाधान ही वाटले. कारण डोंगराएवढे दुःख कोसळलेले असताना, संपूर्ण पवार कुटुंब एक होऊन एक दिलाने समर्थकांना समजून घेत होते. हे पाहिल्यावर पवार कुटुंबाचा सर्वांना हेवा वाटला.
परंतु आता दोन-चार दिवस उलटून गेल्यावर पवार कुटुंबाचे दुर्दैव समोर आले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे जरी दोन पक्ष झाले असले तरीदेखील सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी ताबडतोब मुंबईला यायला नको होते. पक्ष म्हणून काही गोष्टी मनात नसताना स्वीकाराव्या लागतात. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी करता सुनेत्रा पवार या तातडीने
मुंबईत आल्या परंतु त्यांनी असा ताबडतोब निर्णय घ्यायला नको होता. गटनेता, उपमुख्यमंत्री हे पद
सुनेत्रा पवार यांनी स्वीकारले असते आणि १३, १४ दिवसानंतर त्या मुंबईत आल्या असत्या तर ते संयुक्तिक ठरले असते. राजकीय चुली वेगवेगळ्या झाल्या असल्या तरी पवार कुटुंब एकच आहे. हे आख्ख्या महाराष्ट्राला महित आहे. म्हणून सुनेत्रा पवार यांनी कुटुंबाला सांगून बारामतीतून मुंबईला जायला हवे होते. अजित पवार यांनी संपुर्ण पवार कुटुंबाला एकत्र आणण्याची राजकीय खेळी सुरु केली होती. त्याला या हालचालीनंतर ब्रेक लागला आहे.
कै. अजित पवार यांना एक झालेला राष्ट्रवादी पक्ष पुन्हा हवा होता. म्हणून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची युती केली होती. त्याचवेळी काळाने हा दुर्दैवी आघात अजितदादांवर केला. अजित पवार पक्षाचे इतर नेते मंत्री, खासदार पवार कुटुंबाला एकत्र बघण्याच्या तयारीत नव्हते हे आज दिसून आले आहे. म्हणूनच अजित पवार पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी २८ जानेवारी नंतर लगेच सभा घेऊन सुमनेत्रा पवार यांच्यावर पक्षाची जबाबदारी दिली आणि उपमुख्यमंत्री पद दिले. कदाचित देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पक्षाच्या प्रमुख नेत्यांना भीती होती की एखाद्या वेळी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊन
काहीतरी वेगळे राजकीय राजकारण सुरू होईल.
हे फडणवीस आणि अजित पवार पक्षाच्या प्रमुख नेत्यांना नको होते. कदाचित राष्ट्रवादी पक्ष एकत्र आल्यावर ते सत्तेतून बाजूला जातील, मग मात्र एकच पक्ष महायुतीत राहील. असे झाल्यावर तो एक पक्ष मनमानी करू लागेल, म्हणजे शिवसेना शिंदे गट आपल्यावर डोईजड होईल ही भीती असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हालचाल करत हा राजकीय डाव रचला आहे.
हे करताना देवेंद्र फडणवीस यांनी हिंदू धर्माच्या संकेतांना पाळले नाही. हिंदू धर्मात कुणचाही मृत्यू झाल्यावर तेरा दिवस शोक पाळला जातो. त्यानंतर जीवनातल्या जबाबदाऱ्या हळूहळू कुटुंबाकडे दिल्या जातात. मित्र, नातेवाईक यावेळी त्या कुटुंबाला आधार देतात, समजावतात परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या नादान राजकीय खेळीमुळे पवार कुटुंबाला हिंदू धर्माचे संकेत अजिबात पाळता आले नाहीत, हे धार्मिक दृष्ट्या मोठे पाप आहे. हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे तरी देखील यांनी हा राजकीय खेळ रचला. हा राजकीय खेळ तेरा दिवसानंतर केला असता तर तो संयुक्तीक ठरला असता. कारण राजकीय राजकारणात असलेल्या कोणत्याही सत्ताधारी दलाला असा खेळ करण्याचा अधिकार आहे, तो कुणाला नाकारता येणार नाही पण ही खेळी करताना समाजाचे, धर्माचे भान ठेवायचे असते ते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना ठेवले नाही. याचे दुःख आहे. आजचा हा विषय राजकीय विरोधाचा नाही तर तो सामाजिक शिष्टाचाराचा आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
ॲड.रुपेश पवार
9930852165
