अजितदादा पवार यांना वेंगुर्ला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे श्रद्धांजली…
वेंगुर्ले
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वेंगुर्ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आयोजित शोक सभेमध्ये कार्यकर्त्यांनी दादांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. “प्रशासनावर जबरदस्त पकड असलेला आणि विकासाची दूरदृष्टी असलेला अजितदादांसारखा नेता पुन्हा होणे नाही,” अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी आपला शोक व्यक्त केला.
या प्रसंगी अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आदरांजली वाहिली. या शोक सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव सुशील चमनकर, तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, महिला तालुकाध्यक्षा ऋतुजा शेटकर, युवा तालुकाध्यक्ष गजानन कुंभार, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मांजरेकर, प्रवीण परब, विष्णू पेडणेकर यांच्यासह पक्षाचे इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
