You are currently viewing अमरतिथी अवतार मेहेरबाबांची

अमरतिथी अवतार मेहेरबाबांची

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*

 

*अमरतिथी अवतार मेहेरबाबांची* 

 

 

अवतार मेहेरबाबांचे नाव बहुतेक सगळ्यांना ऐकून माहीत आहे. परंतु काहीजणांच्या मनात प्रश्न

असेल की हे कोण अवतार?

मी प्रथम जेंव्हा हे नाव ऐकले तेंव्हा नेमका हाच प्रश्न माझ्या मनात होता. वर्ष होते १९९४ ! हे वर्ष मेहेरबाबांच्या जन्माचे शताब्दी वर्ष होते. माझी एक मैत्रीण मेहेरबाबांची कट्टर भक्त होती. तिच्या प्रेमाखातर थोड्या अनिच्छेने मी प्रथमच मेहेराबाद ला गेले. त्यांनी स्वतःला अवतार म्हणवून घेणे व त्यांना सगळे बाबा म्हणतात ह्या दोन्ही गोष्टी माझ्यासुशिक्षित मनाला खूप खटकत होत्या. आपल्या भारतात बाबा लोकांची कमी नाही नंतर ह्या लोकांनी केलेले उपद्व्याप कळतात, हेच मनात पक्के रुजलेले होते परंतु मेहेराबादला गेल्यावर नाट्यरूपाने माझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळाली. आणखी एक गोष्ट प्रकर्षाने आवडली ती म्हणजे कुठेही तांदूळ प्रसाद ठेवायचा नाही नारळही नाही दानपेटी नाही किंवा दक्षिणाही ठेवायची नाही. दर्शनासाठी लोटालोटी

,चेंगराचेंगरी नाही. समाधीजवळ जाऊन प्रियतमाला फक्त आपले हृदयपुष्प अर्पण करा. मेहेराबाद हे ठिकाण अहमदनगरहुन नऊ दहा कि. मी. अंतरावर आहे.जवळच अरणगाव हे खेडे आहे, जिथे ब्रिटिशांची छावणी होती. मेहरबाबा तिथे राहायला आले व त्या ठिकाणाला मेहेराबाद हे नाव मिळाले.मेहेरबाबांनी लोकांना एकच संदेश दिला तो म्हणजे Real Happiness lies in making others happy.

दुसऱ्याला सुखी आनंदी ठेवण्यातच खरे सुख आहे.

१९२५ साली त्यांनी मौन सुरू केले ते ४४ वर्षे म्हणजेच ३१ जानेवारी १९६९ साली हा नश्वर देह सोडेपर्यंत कायम ठेवले, म्हणून त्यांना मौनावतार असेही म्हणतात. त्यांच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना बाबाप्रेमी म्हणतात, भक्त नाही , आपण पाहतो की भक्त साधारणपणे ऐहिक सुखाचीच मागणी करतात नवस करतात परंतु प्रेमी कधीच मागत नाही प्रेमाखातर सर्वस्व झोकून देणे ही प्रेमाची खरी ओळख असते, मेहेरबाबांनी कधीही कोणताही चमत्कार केला नाही, आयुष्यभर प्रेमाचा संदेश दिला, कुष्ठ रोग्यांची सेवा केली, ईश्वर प्रेमाने वेडे झालेल्या मस्तांची सेवा केली, प्रेमाचा संदेश देत मौन असूनही १८ पेक्षा जास्त देशात फिरले प्रवासात एकदा राजपुताना बोटीत त्यांची म गांधीजींशी भेट झाली होती, ३१ जानेवारी १०६९ मध्ये त्यांनी दुपारी १२ वाजता देह सोडला, ही बातमी bbc वरून प्रसारीत झाली,त्यांचे दर्शन घेण्यासाठी आलेल्याची गर्दी पाहून सात दिवसांनंतर त्यांनी आधीच तयार करून ठेवलेल्या जागेतच त्यांना समाधी देण्यात आली वर्षभर लोक दर्शनाला येत असतात. हे अमरतिथीचे ५७ वे वर्ष आहे ३१जानेवारीच्या

अमरतिथीला भारताच्या कानाकोपऱ्यातून हजारो बाबाप्रेमी मेहराबादला जमतात, ही संख्या दिवसेंदिवस वाढून लाखाच्या वर गेलेली आहे. परदेशातून येणाऱ्याचे प्रमाण ४०० ,५०० झालेले आहे. निवासव्यवस्थेसाठी आधीच आरक्षण केले जाते मानवता व प्रेमाचा संदेश सर्व जगाला देणाऱ्या आपल्या प्रिय मेहेरबाबांना श्रद्धांजली देण्यासाठी सारे जमले असतात. कुठेच गडबड गोंधळ नाही. इतर जत्रेप्रमाणे काहीच नसते, फक्त खाण्यापिण्याची व्यवस्था व मेहेरबाबांशी संबंधित पुस्तके, फोटो बॅजेस एव्हढेच विक्रीला असते.३० तारखेला आरती प्रसादानंतर कार्यक्रमाला सुरवात होते.ह्यात बाबांशी संबंधित भजने, नृत्य, त्यांच्या जीवनावर छोटेसे नाटक किंवा भाषण बाबांचे संदेशवाचन असे कार्यक्रम असतात. ३१ तारखेला दुपारी १२ वाजता प्रियतम बाबांनी नश्वर देहाचा त्याग केला. त्याचवेळी मेहेरबाबांच्या नावाचा जयघोष करून पंधरा मिनिटांचे मौन पाळले जाते. विशाल जनसागर असून वातावरण पूर्णपणे शांत स्तब्ध असते, त्यानंतर पुन्हा सामुदायिक प्रार्थना आरती होऊन दर्शन कार्यक्रम सुरू होतो चेंगराचेंगरी गडबड गोंधळ बिलकुल नाही, नीरव शांततेत दर्शन सोहळा सुरू असतो यासाठी येणाऱ्यांना बुकिंग करतांनाच दर्शन क्रमांक दिलेला असतो ठिकठिकाणी लावलेल्या स्क्रीन वरून कोणता क्रमांक सुरू आहे हे कळते. विश्रांतीनंतर पुन्हा कार्यक्रम सुरू होतात दर्शनही सुरू असते १फेब्रुवारीला सगळ्यांनी मेहेराबाद सोडायचे असते

निवास व्यवस्था, स्वछता स्नान जेवण ,पाणी सगळी व्यवस्था चोख असतेअनेक स्वयंसेवक आधीआठ

दिवसापासूनच कार्यरत

राहून कुठेही गडबड गोंधळ होणार नाही, गैरसोय होणार नाही ह्याची व्यवस्था करीत असतात. आपण वर्षभरात केंव्हाही मेहेराबादला जाऊ शकतो त्यावेळीसुद्धा अल्पदराने राहण्याची जेवण्याची चांगली सोय असते. बाबांच्या सहवासात राहायला मिळणे, त्यांची आपल्यावर मेहेरनजर असणे हे परम भाग्य आहे पूर्वी महिन्यातून दोनदा जाणारी मी, आता माझे स्वतःचे नियमित जाणे होत नाही परंतु जेंव्हा मन उदास होते तेंव्हा काहीतरी निमित्ताने एखादा बाबा प्रेमी तिथून व्हीडिओ कॉल करतो कुणाच्या रूपाने बाबा संदेश देतात

प्रियतम बाबांना एव्हढेच मागणे आहे छोडू तो छोड दू मै ,पर तुम न छोड देना, जुड जो गया है नाता, मेहेर न छोड देना!

अवतार मेहेरबाबाकी जय

 

 

प्रतिभा पिटके

अमरावती

९४२१८२८४१३

प्रतिक्रिया व्यक्त करा