You are currently viewing कालचं ओझं उतरवून

कालचं ओझं उतरवून

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कालचं ओझं उतरवून*

 

उभं रहावं

कालचं ओझं उतरवून

श्वास घेऊन

मुक्तपणे…

 

मुक्तपणे द्यावा

हात भूतकाळाचा सोडून

घट्ट पकडून

वर्तमान…

 

वर्तमानात पहावं

मनावरची धूळ झटकून

जाणवते नवीन

भविष्य…

 

भविष्यात असतो

थकव्यामागे प्रवास लपून

अंधारात चालून

आशेचा…

 

आशेच्या ओझ्याखाली

वाकलेलं पहावं स्वप्न

ओळख सांगून

विश्वासानं…

 

विश्वासाने पराभवाला

द्यावं बाजूला ठेवून

शांतपणे ओळखून

यशाला…

 

यशाच्या अपेक्षांतही

वाट जाते सापडून

फुलते वेदनेतून

मनही…

 

मनाने हलक्या

जातो अडसर निघून

भिंती ओलांडून

भीतीच्या…

 

भीतीतही ठेवावा

खरा विश्वास सामर्थ्यानं

निर्णय उमजून

जीवनात…

 

जीवन सावरतं

कालचं ओझं उतरवून

अथक शिकवण

जिंकण्यास…

 

 

सौ. प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणै©®

प्रतिक्रिया व्यक्त करा