You are currently viewing भटवाडी परिसरात मगरीचा वावर;

भटवाडी परिसरात मगरीचा वावर;

भटवाडी परिसरात मगरीचा वावर;

ग्रामस्थांमध्ये भीती, तातडीच्या उपाययोजनांची मागणी

सावंतवाडी

भटवाडी परिसरात लोकवस्तीच्या अगदी जवळ मगरीचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काजरकोंड पुलाजवळील पाण्यात गेल्या काही दिवसांपासून सुमारे ७ ते ८ फूट लांबीची मगर दिसून येत असून, यामुळे शेतकरी व ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या भागातील गावडे कुटुंबाची शेती तसेच निवासस्थान पाण्यालगतच आहे. शेतीकामासाठी व गुरेढोरे घेऊन जाण्यासाठी त्यांना याच पाण्यातून मार्गक्रमण करावे लागते. मात्र मगरीच्या सततच्या उपस्थितीमुळे प्रत्येक वेळी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
यासंदर्भात शेखर सुभेदार यांनी उमेश गावडे, विकास सावंत, तेजस गावडे व समर्थ सुभेदार यांच्या सोबत वनविभागाकडे निवेदन सादर केले आहे. मगरीला लवकरात लवकर सुरक्षितपणे पकडण्यात येईल, असे आश्वासन वनविभागाकडून ग्रामस्थांना देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा