You are currently viewing डॉ. बबन बेलसरे यांना जीवन गौरव पुरस्कार उद्या नागपुरात सन्मान 

डॉ. बबन बेलसरे यांना जीवन गौरव पुरस्कार उद्या नागपुरात सन्मान 

अमरावती :

अमरावती शहरातील सामाजिक बांधिलकीचे सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यवसायी डॉ. बबन बेलसरे यांना विदर्भस्तरीय वैद्यकीय क्षेत्रातील या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा जीवन गौरव पुरस्कार शनिवार दि. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वा. नागपूर येथील रामदास पेठेतील सुप्रसिद्ध सेंट्रल पॉईंट हॉटेलच्या सभागृहात वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर अतिथींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन एओआय व एच एन एस या संघटनांनी त्यांच्या विदर्भस्तरीय अधिवेशनामध्ये आयोजित केला आहे.

डॉ. बबन बेलसरे यांचा वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात चांगला नावलौकिक असून ते अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष आहेत. गेल्या वीस वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा श्री प्रा. शाम मानव यांचे कार्यक्रम ते अमरावती शहरात आयोजित करीत आहेत. याशिवाय मिशन आयएएस डॉ. पंजाबराव देशमुख आय ए एस अकादमी साहित्य संगम विदर्भ सत्यशोधक मंडळ इंडियन मेडिकल असोसिएशन प्रयास या विविध संस्थांशी पदाधिकारी म्हणून त्यांचा जवळचा संबंध आहे. त्यांचे शालेय शिक्षण अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथील एस एल हायस्कूलमध्ये झाले असून महाविद्यालयीन शिक्षण अमरावतीच्या शासकीय विदर्भ महाविद्यालयात तर एमबीबीएस त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालयातून पूर्ण केले आहे.

सामाजिक बांधिलकी जपणारा डॉक्टर म्हणून त्यांचा सर्वत्र नावलौकिक आहे. अमरावती शहरात होणाऱ्या विविध सामाजिक साहित्यिक शैक्षणिक सांस्कृतिक चळवळीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. या सत्कार समारोहात त्यांच्याबरोबर त्यांच्या अर्धांगिनी प्रा. सौ रेखा बेलसरे यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. त्यांना मिळालेल्या ह्या जीवनगौरव पुरस्काराबद्दल मिशन

आयएएसचे संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा