तू माझी….परी

तू माझी….परी

तू माझी….परी

तू माझी परी,
स्वप्नातही मला नकळत,
हसवणारी…

तू एक कळी,
कधीही न कोमेजण्यासाठी,
फुलणारी…

तू माझी आशा,
जगण्याची नवी दिशा,
दाखवणारी…

तू तेजस्वी सूर्यकिरण,
दाही दिशा उजळून,
दिपवणारी…

तू चंद्राची शीतल छाया,
अंधारावरही सहज मात,
करणारी…

तू माझी ….. परी !!!!!

(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा