You are currently viewing नृत्यांगण कथ्थक क्लासेसचा शास्त्रीय नृत्यामधील ‘कथ्थक’ या विषयामध्ये शंभर टक्के निकाल

नृत्यांगण कथ्थक क्लासेसचा शास्त्रीय नृत्यामधील ‘कथ्थक’ या विषयामध्ये शंभर टक्के निकाल

*नृत्यांगण कथ्थक क्लासेसचा शास्त्रीय नृत्यामधील ‘कथ्थक’ या विषयामध्ये शंभर टक्के निकाल :*

सावंतवाडी

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या शास्त्रीय नृत्य ‘कथ्थक’ या विषयामध्ये नृत्यांगण कथ्थक क्लासेसचा १००% निकाल लागला. या क्लासेसच्या ओरोस, कुडाळ, माणगाव, सावंतवाडी व बांदा, कोलगाव येथे शाखा असून शाखेच्या संचालिका सौ. कश्मीरा ऋजुल पाटणकर या आहेत. या परीक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे, प्रारंभिक परीक्षेत कु. अनोमा कामत, कु. जान्हवी तुळसकर, कु. सलोनी सावंत, कु. श्राव्या गावडे, कु. आत्रेया काणेकर, कु. जुई शेर्लेकर, कु. साक्षी परब, कु. मृण्मयी पंडित, कु. चैतन्या कोलते, कु. सोनाली बोभाटे, कु. हास्या कावले, कु. अर्शिन शेख, कु. कारुण्या परब, कु. सान्वी सावंत, कु. प्रांजल परब, कु. ईश्वरी बोभाटे, कु. शुभ्रा बांदेकर, कु. राधा कुशे, कु. संजना पवार, कु. मुग्धा टोपले, कु. नंदिता शेटये, कु. संतोषी जमादार, कु. दीक्षा नाईक, कु. स्पृहा सितावर, कु. सानिका मदने, कु. ऐश्वर्या तेली, कु. क्रिशा साळवी, कु. सिद्धेश पालव, कु. दृष्टी मुंडये, कु. प्रिया राणे, कु. श्राव्या धुरी, कु. स्नेहल परब, कु. श्रीष्टी करडे, कु. धन्यवी शृंगारे, कु. प्रार्थना नाईक, कु. गार्गी आजगावकर या विद्यार्थ्यांना विशेष योग्यता श्रेणी प्राप्त झाली. तर, कु. यश्विनी खवणेकर, कु. अनाया ठाकूर, कु. ऋत्वी पेंडसे, कु. वीरा कदम, कु. श्रेया राणे, कु. प्रिया विरोडकर, कु. अस्मि सावंत, कु. आरोही परब, कु. कनिष्का जळवी, कु. दिपाली मेस्त्री, कु. सोनाली जाधव, कु. स्पृहा कांबळी, कु. वेदा धारगळकर, कु. किंजल कोरगावकर, कु. राधिका शेटकर, कु. सई नाईक, कु. गायत्री तानावडे, कु. परिधी निकम, कु. जान्हवी जानकर, कु. वैष्णवी बोडके, कु. राजवी गोंदावळे, कु. जिज्ञासा सावंत, कु. आराध्या गावडे, कु. लावण्या केसरकर, कु. निलया शिंदे, कु. नुवैरा सय्यद यांनी प्रथम श्रेणी पटकावली. तसेच, प्रथम प्रवेशिका असलेल्या द्वितीय परीक्षेत कु. अनुप्रिया राणे, कु. समृद्धी नेरकर, कु. ईशा टिळवे, कु. सिया शेटकर यांनी प्रथम श्रेणी व कु. साधना पारधी, कु. दुर्वा बाणे यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली. मध्यमा पूर्ण असलेल्या पाचव्या परीक्षेत कु. सलोनी कदम हिने प्रथम श्रेणी व कु. मनस्वी माड्ये हिने द्वितीय श्रेणी पटकावली. त्याचप्रमाणे, प्रवेशिका पुर्ण असलेल्या तिसऱ्या परीक्षेत कु. जेलिशा तेजम, कु. ब्रम्ही निवेळकर यांनी विशेष योग्यता श्रेणी, कु. खुशी गावडे, कु. तन्वी तवटे, कु. मृण्मयी गवस, कु. सुविधा वाळवे, कु. गगन लेले, कु. प्राप्ती देऊलकर यांनी प्रथम श्रेणी व कु. जागृती तेजम हिने द्वितीय श्रेणी पटकावली. तर, मध्यमा प्रथम परीक्षेत कु. वेदांगी पटवर्धन हिने विशेष योग्यता श्रेणी, कु. केतकी राऊळ, कु. पवित्रा मातोंडकर, कु. स्फूर्ती सितावर यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. सर्व विद्यार्थिनींनी वरील परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. याकरिता, नृत्यांगण कथ्थक क्लासेसच्या संस्थापिका सौ. कश्मिर ऋजुल पाटणकर यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा