सडेतोड नेतृत्व हरपले : अजित नाडकर्णी
अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली
कणकवली
कणकवली तालुक्याच्या राजकारणात ठसा उमटवणारे, सडेतोड निर्णयक्षमता आणि कार्यकर्त्यांशी असलेली आपुलकी यासाठी ओळखले जाणारे अजित दादा आज काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या निधनाने एक सजीव, कर्तव्यदक्ष आणि धुरंधर नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
१९९५ साली कणकवली राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना अजित दादांना जवळून पाहण्याचा योग अनेकदा आला. संदेश पारकर यांच्यासोबत प्रत्येक भेटीचा प्रसंग घडत असे. सकाळी नेमके सहा वाजता कार्यालयात हजर राहून कामाला सुरुवात करणारा असा शिस्तप्रिय नेता आजपर्यंत पाहिला नसल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
काम होणार असेल तर स्पष्ट “होईल” आणि शक्य नसेल तर ठाम “नाही” असे सांगणारा प्रामाणिक नेता म्हणून त्यांची ओळख होती. कुर्ली धरणाच्या पाहणीवेळी एका कार्यकर्त्याच्या हातातील हार पाहून सुरक्षेला बाजूला सारत, “हा माझा कार्यकर्ता आहे, आणि आमचे नावही एकच आहे,” असे सांगत त्यांनी दाखवलेली आपुलकी आजही अनेकांच्या स्मरणात आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला नावाने ओळखणारा नेता म्हणून अजित दादांचे नेतृत्व वेगळे ठरले.
अजित दादांच्या निधनाने कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली असून सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
अजित नाडकर्णी कुटुंबीयांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
