मालवण :
मालवण तालुक्यातील महायुतीतर्फे आडवली–मालडी पंचायत समिती मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार तथा माजी सभापती सीमा सतीश परुळेकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार रोहिणी अरुण राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे सीमा सतीश परुळेकर यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
या बिनविरोध निवडीमुळे आडवली–मालडी पंचायत समिती मतदारसंघात महायुतीने आपले वर्चस्व अधिक मजबूत केले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
