You are currently viewing कोळपे जि. प. मध्ये भाजपाचे प्रमोद रावराणे बिनविरोध

कोळपे जि. प. मध्ये भाजपाचे प्रमोद रावराणे बिनविरोध

कोळपे जि. प. मध्ये भाजपाचे प्रमोद रावराणे बिनविरोध

*पालकमंत्री नितेश राणेंचा राजकीय दबदबा; उबाठाची माघार, कोळपे जि.प.मध्ये भाजपाचा जल्लोष
उबाठाच्या जितेंद्र तळेकर यांची रिंगणातून माघार

वैभववाडीत भाजपात जल्लोष तर उबाठात सन्नाटा

वैभववाडी
कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातील उबाठा चे उमेदवार जितेंद्र तळेकर हे भाजपाच्या गळाला लागले आहेत. त्यांनी या निवडणूकित नांगी टाकत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार प्रमोद रावराणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रमोद रावराणे यांची बिनविरोध निवड होताच भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष व्यक्त केला जात आहे.
या मतदारसंघात उबाठाच्या सुनिल नारकर यांचा अर्ज छानणीत बाद झाला होता. तर दुसरे उमेदवार जितेंद्र तळेकर यांनी अर्ज मागे घेतला.
त्याचप्रमाणे भाजपाच्या डमी उमेदवार राजेंद्र राणे, अनंत फोंडके, अतुल सरवटे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे एकमेव उमेदवार असलेले प्रमोद रावराणे बिनविरोध झाले आहेत. या अगोदर कोकिसरे पंचायत समितीच्या भाजपाच्या उमेदवार साधना नकाशे बिनविरोध ठरल्या आहेत. त्यामुळे उबाठा सेनेला धाक्यावर धक्के बसत आहेत. तर भाजपाचा विजयाचा वारू सुसाट सुटला असून भाजपा कार्यकर्ते जल्लोष करीत असून उबाठा सेनेत सन्नाटा पसरला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा