पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली नांदगाव पंचायत समिती भाजपाकडे; हर्षदा वाळके बिनविरोध
नांदगाव पंचायत समिती पदी हर्षदा वाळके बिनविरोध
नांदगाव :
नांदगाव पंचायत समिती सदस्यपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार हर्षदा वाळके या बिनविरोध निवडून येणार आहेत. त्यांच्या विरोधात ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार धनश्री मेस्त्री तसेच अपक्ष उमेदवार प्राची निरज मोरये यांनी आज उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने हा निर्णय निश्चित झाला आहे. निवडणूक प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या घडामोडींमुळे नांदगाव पंचायत समिती मतदार संघात भाजपाचा विजय निर्विवाद ठरला आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीकडून विरोधकांना जोरदार राजकीय धक्का देण्यात आला आहे. सर्व कायदेशीर व रीतसर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हर्षदा वाळके यांची बिनविरोध निवड अधिकृतपणे घोषित करण्यात येणार आहे. या बिनविरोध निवडीमुळे नांदगाव तालुक्यात भाजपाच्या बळकटीकरणाला आणखी चालना मिळाली असून, आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
