*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नको वाजवायला कुणी शिट्टी*
करून तयारी आंघोळीची
उघड्यावरती चूल मांडली
टबात ठेवून *सर्वं लुगडी*
चुलीत फाटी सारत बसली
//1//
हीच अवस्था घराघरातून
*नाही चित्र वेगळे कुठे*
सोबत बसते मांजर भोळी
मालकिणी संगे तीही उठे
//2//
समाचार घेऊन उंदरांचा
नाश्ता करते दूध पिऊन
नाही घालत तोंड दुधात
आजीने ठेवल्ये शिकवून
//3//
लावून नंबर आंघोळीसाठी
पाणी लागते गरम करून
काटक्या कुटक्या इंधन सारे
आणावे लागते फार दुरून
//4//
उठून “पळाली” पोरे सारी
शाळेला आहे आज *सुट्टी*
येते गिळायला वानर सेनी
नको वाजवाला कुणी शिट्टी
//5//
विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157
