You are currently viewing मळगाव येथे महायुतीच्या प्रचाराचा उत्साहात शुभारंभ; संदीप गावडे व गौरव मुळीक यांच्यासाठी मायापूर्वचारी चरणी साकडे
Oplus_16908288

मळगाव येथे महायुतीच्या प्रचाराचा उत्साहात शुभारंभ; संदीप गावडे व गौरव मुळीक यांच्यासाठी मायापूर्वचारी चरणी साकडे

सावंतवाडी :

भाजप–शिंदे शिवसेना महायुतीकडून तळवडे जिल्हा परिषद उमेदवार संदीप गावडे व मळगाव–नेमळे पंचायत समिती उमेदवार गौरव मुळीक यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज मळगाव येथील श्री देव मायापूर्वचारी मंदिरात श्रीफळ ठेवून व साकडे घालून मोठ्या उत्साहात करण्यात आला.

यावेळी महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी होऊन भाजप–शिवसेना महायुतीची सत्ता प्रस्थापित व्हावी, अशी प्रार्थना मायापूर्वचारी चरणी करण्यात आली.

या प्रसंगी मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच तथा भाजप शक्ती केंद्रप्रमुख गणेशप्रसाद पेडणेकर, भाजप जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत जाधव, माजी सरपंच निलेश कुडव, भाजप सावंतवाडी तालुका चिटणीस सिद्धेश तेंडोलकर, नीलकंठ बुगडे, निकिता बुगडे, बूथ अध्यक्ष महेश गवंडे, सुदेश राऊळ, रुपेश सावंत, दीपक जोशी, मदन तेंडोलकर, निलेश राऊळ, ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ राऊळ, निकिता राऊळ यांच्यासह भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मायापूर्वचारी मंदिरात साकडे घातल्यानंतर ब्राम्हण पाट परिसरातील वाड्यांमध्ये घरोघरी जाऊन प्रचारास प्रारंभ करण्यात आला. या प्रचारात भाजप–शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा