यशवंतगड संवर्धनासाठी शिवप्रेमींची ऐतिहासिक एकजूट –
८५ ते ९० मावळ्यांचा श्रमदान सोहळा संपन्न
रेडी
रेडी येथील प्रसिद्ध श्री यशवंतगडावर *दुर्गरक्षक प्रतिष्ठान,रेडी, तसेच शिवसृष्टी मित्रमंडळ, तिरोडा आणि शिवप्रेमी मित्रमंडळ,शेर्ले, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, भारत* आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे *मराठा करिअर अकॅडमी, सावंतवाडी (आर्मी – पोलिस भरती) यांचे जवळजवळ ५० ते ६० विद्यार्थी* असे एकूण अंदाजे ८५- ९० शिवप्रेमी यांच्या अथक परिश्रमाने रविवार दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजीची मोहीम संपन्न झाली.
ह्या गड संवर्धन कार्यात प्रामुख्याने यशवंतगडाच्या दर्शनी भागावर म्हणजेच गडाचा दुसरा आणि तिसरा दरवाजा आणि वरील तटबंदी यांच्या स्वच्छतेवर भर देण्यात आला.
भारतीय सैन्य आणि पोलिस यांच्या कामाची शिस्त काय व कशी असते याचा सर्वांना अनुभव आला.
सर्व शिवप्रेमी मावळे युवक युवतीनीं अगदी जीव ओतून गड संवर्धन व स्वच्छतेचे काम केले.
अकादमीच्या श्री.विशाल मोहिते यांनी सर्वांना शिवविचार काय असतात याचे शिवकालीन प्रसंगाची माहिती देऊन काळाची गरज ओळखून वागण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच तुम्ही कधीही हाक द्या, आपण आणि आपली मुले कायम आपल्या सोबत आहेत ह्या गडाच्या, वास्तू च्या संरक्षण व संवर्धनासाठी सदैव सोबत हजर असू असे आश्वासन दिले.
श्री.पुरुषोत्तम शेणई गुरुजी यांच्या पुढाकाराने सदर मोहीम आयोजित करण्यात आली होती. त्यांनी फक्त शिवाजी महाराज की जय म्हटले आणि फक्त शिवजयंती साजरी करणे म्हणजे शिवप्रेम नसते तर महाराजांचे गडकिल्ले संवर्धन करणे म्हणजे खरे शिवप्रेम असते ते व ते वेळोवेळी आपल्याला जेव्हा संधी भेटेल तेव्हा तेव्हा ह्या गडाच्या सानिध्यात येऊन ह्या महान कार्यात सहभागी होण्याचे आवाहन उपस्थित युवा वर्गाला केले.
सदर मोहिमेमध्ये गडावरील वाढलेली झाडी, झुडूपे तसेच पाला पाचोळा, कचरा एकत्र करीत संपूर्ण परिसर हा साफ करण्यात आला.
दुर्गरक्षक प्रतिष्ठान,रेडी, शिवसृष्टी मित्रमंडळ,तिरोडा,मराठा करियर अकॅडमी, सावंतवाडी, शिवप्रेमी मित्रमंडळ,शेर्ले, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, भारत ह्या सर्व शिवप्रेमी संस्थानी सहभाग घेऊन मोहीम यशस्वी केली.
