*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तिरंगा*
या तिरंग्यासाठी होमकूंड पेटले,
आपले प्राण आहुती अनेकांनी दिले,
स्वातंत्र्य सैनिकांनी रक्त आपले सांडले.
या तिरंग्यासाठी घरसंसार सोडले.
आभिमान मज या तिरंग्याचा,
सन्मान हा मायभूच्या सौभाग्याचा,
गौरव आमुच्या संविधानाचा,
रूबाब आमच्या लोकशाहीचा.
त्या संघर्षाची आठवण,
सांडलेल्या रक्ताची आण,
सांगतो फडकत हा तिरंगा,
त्याच्यासाठी केले सर्वस्व अर्पण.
डंका वाजतो किर्तीचा विश्वात,
मिळाली बंधुता अन् समानता,
लाभले स्वातंत्र्य अन् संविधान,
झाली स्वतंत्र आमुची भारतमाता.
हा तिरंगा डौलात ऊभारूया,
स्वातंत्र्याची गाथा जगा ऐकवूया,
हुतात्म्यांचे स्मरण करूया,
त्याच्यासाठी सदैव सज्ज राहूया.
अनुराधा जोशी.9820023605
