फोंडाघाटमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
ग्रामपंचायत व मराठी शाळेसमोर सार्वजनिक झेंडावंदन; विद्यार्थ्यांचा देशभक्तीपूर्ण सहभाग
फोंडाघाट
फोंडाघाट येथे ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत व मराठी शाळेसमोर सार्वजनिक झेंडावंदन कार्यक्रम उत्साहात पार पडला. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने ग्रामपंचायतीतर्फे मानस्वी फाले शुटींग सुवर्णपदक विजेती विद्यार्थिनी हिला झेंडावंदनाचा मान देण्यात आला.
तसेच सार्वजनिक झेंडावंदनाचा मान सेवानिवृत्त आर्मी अधिकारी श्री. चव्हाण यांना देण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांची देशभक्तीपर भाषणे, संविधान वाचन, सरपंचांचे शुभेच्छा संदेश, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. या सर्व उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर राष्ट्रमय झाला होता.
या कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व कर्मचारी, व्यापारी वर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
यावेळी विद्यार्थ्यांनी “१० वी व १२ वी परीक्षा कॉपीमुक्त करा” या विषयावर प्रतिज्ञा वाचन केले. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती आयोजकांनी दिली.
— अजित नाडकर्णी, शुभांजित श्रुष्टी
