कुडाळ :
महायुतीच्या आगामी निवडणूक तयारीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीस कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी सर्व उमेदवार व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत संघटनाची ताकद, एकजूट आणि विजयाचा संकल्प अधिक मजबूत करण्यावर भर दिला.
महायुतीची धोरणात्मक भूमिका, निवडणूक व्यवस्थापन तसेच जनतेचा विश्वास अधिक दृढ कसा करता येईल, यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांवर आणि जनतेच्या विश्वासावर ठामपणे विजय मिळवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक संजय मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तसेच राजू राऊळ, अशोक सावंत, संजय वेंगुर्लेकर, विनायक राणे, शिवसेना महिला सेना प्रमुख दिपलक्ष्मी पडते, संजय पडते, दादा साईल यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
