*घारपी शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन २६ जानेवारी रोजी*
*बांदा*
घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ सोहळा सोमवार दि. २६ जानेवारी २०२६ रोजी शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ध्वजारोहणाने होणार असून यादिवशी रात्री आठ वाजता विद्यार्थ्यांचा गुणगौरव बक्षीस वितरण सोहळा व विद्यार्थ्यांचा कलाविष्कार हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे . यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या ज्ञानगंगा या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांनी या स्नेहसंमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक जे.डी.पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गावकर सदस्य,माजी विद्यार्थी संघ,शालेय मंत्रीमंडळ यांनी केले आहे.
