*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सूर्याला साथ चंद्राची…!*
नभोमंडल ग्रहतार्यांत
सूर्याला साथ चंद्राची
विश्व चालविण्याची
नित्यनेमाने…
नित्यनेमाने सूर्य,
चंद्र दिनराती उगवती
प्रकाश देती
आशेचा…
आशेत सूर्याला
साथ लाभते चंद्राची
श्वास घेण्याची
शांततेने…
शांतपणे दोघेही
जगाला दिशा दाखवती
दीप बनती
उजेडाचा…
उजेडाच्या प्रखरतेची
तप्तता साहून लढण्याची
सूर्याला सहाय्यतेची
चंद्रसाथ…
दोघांशिवाय नाही
पहाट होत आयुष्याची
सांगता निसर्गाची
अर्थाने…
अर्थपूर्ण समतोलात
सूर्याला साथ चंद्राची
सुंदरतेने गुंफण्याची
जीवनाला…
जीवनात यशापयशाच्या
वाटा एकत्र चालती
हळुवार पेरती
समजूत…
समजुतीने जीवनपथावर
सूर्याला साथ चंद्राची
सजग सहजीवनाची
तेजस्वी..
तेजाबरोबर शांतीने
जीवनाला अर्थ येण्याची
गमके होण्याची
यशस्वी…
प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
