सावंतवाडी :
माजगाव गुलाबी तिठा इथं अपघातांच वाढलेलं प्रमाण पाहून राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे उपाध्यक्ष आसिफ शेख यांनी बांधकाम विभागाला स्वखर्चानं या रस्त्यावर ‘स्पीड ब्रेकर’ बसवून घेत असल्यानं परवानगी मिळावी असं पत्र दिल होत. मात्र, निष्क्रिय बांधकाम विभागानं या पत्राला परवानगी देण्यासाठी देखील दोन महिने काढले. आज सकाळी या रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातानंतर राष्ट्रवादीनं संतप्त भुमिका घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तर आसिफ शेख यांनी स्वखर्चानं या रस्त्यावर दोन स्पीड ब्रेकर बसवत समाजासमोर आदर्श घालून दिला. या कार्याबद्दल राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी त्यांचे कौतुक केले. तर बांधकाम विभाग अजून किती जीव घेणार असा जाब विचारत या संबंधी विरिष्ठांची भेट घेत तक्रार करणार, तर वेळ प्रसंगी सत्तेत असलो तरी जनतेसाठी रस्त्यावर उतरणार अस मत पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जात अत्याधुनिक स्पीड ब्रेकरची पहाणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, डी. के. सावंत, शहराध्यक्ष देवा टेंमकर, शाफिक खान, जावेद शेख, आशिष कदम, नंदू साटेलकर, इफ्तिकार राजगुरू, बावतीस फर्नांडिस, राजू धारपवार, अभिजीत पवार, सुरेश वडाकर, आसिफ ख्वाजा, प्रसाद दळवी आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.