कणकवलीत शिवसेना–भाजपा युतीचा झेंडा; रुहिता तांबे बिनविरोध विजयी
जानवली जिल्हा परिषद मतदारसंघात ठाकरे सेनेला धक्का, हेलन कांबळेंनी घेतली माघार
कणकवली
कणकवली तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना–भाजपा युतीला मोठे यश मिळाले आहे. जानवली जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार रुहिता तांबे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. ठाकरे सेनेच्या उमेदवार हेलन कांबळे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने हा मार्ग मोकळा झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना–भाजपा युतीकडून ठाकरे सेनेला सलग धक्के दिले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. जानवली मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात ठाकरे सेनेच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे रुहिता तांबे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
या बिनविरोध निवडीमुळे कणकवली तालुक्यात शिवसेना–भाजपा युतीचे राजकीय वजन अधिक मजबूत झाले असून, आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा युतीसाठी मोठा आत्मविश्वास देणारा विजय मानला जात आहे.
