You are currently viewing घावनळेत महायुतीच्या प्रचाराला जोरदार प्रारंभ
Oplus_16908288

घावनळेत महायुतीच्या प्रचाराला जोरदार प्रारंभ

दीपक नारकर यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास

कुडाळ :

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घावनळे मतदारसंघात महायुतीने प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद घावनळे मतदारसंघासाठी दीपक नारकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, त्यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे.

घावनळे व परिसरातील गावांमध्ये दीपक नारकर यांचा भक्कम जनसंपर्क, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सखोल जाण आणि सातत्यपूर्ण कार्य पाहता पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे शिवसैनिकांमध्ये तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारलेला दिसून येत आहे.

याचवेळी पंचायत समितीसाठी भाजपच्या उमेदवार अर्चना घावनळकर यांच्यासह शिवसेना–भाजप महायुतीचे जिल्हा व तालुका स्तरावरील प्रमुख पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी ग्रामदैवत श्री देव रामेश्वर यांचे आशीर्वाद घेण्यात आले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना उमेदवारांनी, “गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे,” असा ठाम विश्वास व्यक्त केला.

या प्रचाराच्या शुभारंभाला स्थानिक ग्रामस्थांनी मोठी गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दीपक नारकर यांचा जनसंपर्क या निवडणुकीत निर्णायक ठरणार असून, महायुतीच्या आक्रमक प्रचारामुळे विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा