You are currently viewing माजगाव मतदारसंघात विक्रांत सावंतांचा प्रचार शुभारंभ

माजगाव मतदारसंघात विक्रांत सावंतांचा प्रचार शुभारंभ

देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन घरोघरी विकासाचा संकल्प

सावंतवाडी / माजगाव :

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजगाव मतदारसंघातून तरुण, तडफदार युवा नेतृत्व आणि शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी आपल्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला आहे.

माजगाव येथील स्वयंभू महादेव मंदिर व श्री देवी सातेरी मंदिरात नतमस्तक होत देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर माजी मंत्री स्व. भाईसाहेब सावंत यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली.

भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी दाखल केलेल्या विक्रांत सावंत यांनी यावेळी बोलताना, “हा प्रचार निवडणुकीपुरता नसून माजगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा शुभारंभ आहे. स्व. भाईसाहेब सावंत व स्व. विकास सावंत यांचा विकासाचा वारसा पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे,” अशी भावना व्यक्त केली. तसेच माजगाव, सोनुर्ली, वेत्ये, चराठे, ओटवणे व सरमळे येथील ग्रामस्थ आपल्याला आशीर्वाद देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, शिवसेना नेते अशोक दळवी, पंचायत समिती उमेदवार सचिन बिर्जे, माजगाव सरपंच रिचर्ड डिमेलो, आर. के. सावंत, संजय कानसे, ॲड. शामराव सावंत, सी. एल. नाईक, चंद्रकांत सावंत, अमोल सावंत, प्रा. बाळासाहेब नंदिहळ्ळी, अखिलेश कानसे, पी. ए. सावंत, श्री. गवंडी, शुभम रेडकर, ऋतिक कोरगावकर यांच्यासह भाजप व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा