यशवंत गड शिवप्रेमी कडून करण्यात आले आयोजन
वेंगुर्ले
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील रेडी येथील यशवंत गडावर शिवप्रेमी कडून शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शासनाच्या नियमांचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच गडावर महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे. यावेळी श्री. बागलकर हे शिवप्रेमींना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच यावेळी सागरी जीव रक्षकांचे सत्कार करण्यात येणारं आहेत. यावेळी वेंगुर्ला महोत्सव आणि सावंतवाडी येथील स्पर्धेत चित्ररथ साकारणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे. यशवंत गड सवर्धन मोहिमेस दुर्गवीर प्रतिष्ठान, वेताळ प्रतिष्ठान, शिवप्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शिवप्रेमी, तसेच इतर संघटना नेहमी सहकार्य करत असतात. या सर्व संघटनांचे देखील यशवंत गडावर सत्कार केला जाणार आहे. यशवंत गडावर दर शनिवार, रविवार व सोमवार या दिवशी श्रमदान मोहीम सुरू असते. अशी माहिती शिवप्रेमी कडून देण्यात आली आहे.