You are currently viewing प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

*स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल…..*

======================

*प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित* 

====================

अमरावती दि.21- राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त व अल्हाज असद बाबा त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मुंबईच्या आसद बाबा मेमोरियल ट्रस्ट तर्फे अमरावतीचे सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ व डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आय ए एस चे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मगावी सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जिजाऊ सृष्टीच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुस्लिम धर्मगुरू श्री मौलाना रिझवी हे होते. प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात गेल्या 25 वर्षात जी अविरत विनामूल्य सेवा दिली त्याबद्दल हा यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सर्वश्री देवेंद्र भाई जैन साधक मुंबई भुगृ विठाधिरेश्वर दिल्लीचे महाराज स्वामी सुशील गोस्वामी बुलढाणा अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुकेश झंवर डॉ. रमाकांत देशपांडे. अमेरिकेचे राजदूत डॉ. सोमशेखर मुंबईच्या सहायक पोलीस आयुक्त श्रीमती शेख तसेच कोरिया व इंडोनेशिया येथून झाले आलेले श्री.ए.डी वांदियो व दक्षिण कोरियाचे राजदूत सुकीं पार्क व असद बाबा ट्रस्टचे श्री अमजद खान पठान तसेच जीएसटीचे उपायुक्त श्री मेहबूब कासार व त्यांच्या पत्नी सौ परवीन सुलताना हे उपस्थित होते.

याप्रसंगी सौ विद्या काठोळे यांचा देखील शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पुस्तक प्रकाशन रक्तदान शिबिर, रोग निदान शिबिर याचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील तसेच बाहेर जाऊन आलेल्या मान्यवरांची चांगली उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता असद बाबा मेमोरियल ट्रस्टचे मुख्य संचालक श्री अमजद खान पठाण यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

======================

प्रकाशनार्थ

रवींद्र दांडगे

जनसंपर्क अधिकारी

मिशन आयएएस अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा