*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित लेख*
*जरा विसावू या वळणावर*
पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने
पौष महिना हा तिळगुळ देण्या घेण्याचा! आज तिलकुंद चतुर्थी, श्री गणेशजयंती आहे, आणि आज श्री जगदिशजी सायसिकमल ह्यांचा वाढदिवस व त्यांच्या जरा विसावू ह्या वळणावर ह्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आपल्या अमरावतीच्या अनेक थोर विभूतीचे चरणस्पर्श लाभलेल्या जोशीं हॉल मध्ये होणार आहे, त्रिवेणी संगमावर होत असलेल्या या कुंभमेळा समारंभाला जीवन गौरव पुरस्कार व बाळशास्त्री जांभेकर नावाचा दर्पण पुरस्कार मिळालेले प्रसिद्ध वरिष्ठ पत्रकार श्री न. मा. जोशी अध्यक्ष म्हणून लाभणे हे तर सोनेपे सुहागा ! कार्यक्रमाची पत्रिका पाहिली
आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मी न.मा. वर लिहिलेल्या लेखाची आठवण झाली. गेल्या पाच दशकापासून त्यांच्या वाणी व लेखणीने ते सगळ्यांना सुपरिचित आहेत.
दै हिंदुस्थानचे श्री उल्हास मराठे हे देखील त्यांच्या संपादकीय लेखामुळे आपल्या सगळ्यांचे आवडते! दै हिंदुस्थानची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या श्री. उल्हासजी बद्दल आम्हा सगळ्यांच्या मनात नितांत आदर आहे.
ह्या कार्यक्रमाची उत्सवमूर्ती श्री जगदिशजी! दोन शब्दात बोलायचे तर अतिशय नम्र व गुणग्राही दिलदार व्यक्तिमत्व! प्रत्येक कार्यात पत्नीची साथ!
मुंगी जमिनीवरील लहानसाही कण उचलून घेते, तसा त्यांचा स्वभाव आहे. दुसऱ्याच्या लहान सहान कामाबद्दल तारीफ करण्याची त्यांची पद्धत मनाला भावणारी!तसेच दुसऱ्याच्या दुःखात आपण सहभागी असले पाहिजे ही त्यांची सामाजिक बांधिलकी देखील मी अनुभवली आहे. पुस्तक वाचतांना वाचकांच्या ही गोष्ट सहजच लक्ष्यात येईल ,ते फार मोठे साहित्यिक नाहीत परंतु माणूस म्हणून त्यांचे निरीक्षण
खूप छान आहे ह्या निरीक्षणातूनच पुस्तकाची निर्मिती झाली आहे.
अर्थशास्त्रात MA झालेले जगदिशजी प्रशासन शाखेतील सहायक प्रशासक अधिकारी या पदावरून निवृत्त झाले आहेत.अनेक पुरस्कार, सन्मान मिळविणारे जगदिशजी अनेक संस्था मध्ये प्रशिक्षकांची भूमिका योग्य प्रकारे निभावतात. एकवीरा देवीच्या मंदिरातही सेवा देतात. अगदी साध्या सरळ स्वभावाच्या जगदीशजींचे जरा विसावू या वळणावर हे पुस्तक म्हणजे त्यांच्या स्वच्छ नितळ मनाचा आरसा आहे असं म्हटलं तर वावगे होणार नाही एकूण २१ प्रकरणे असलेल्या या पुस्तकात आपल्याला हे नक्कीच जाणवेल. खूप बोलके मुखपृष्ठ असलेले हे पुस्तक त्यांनी आपल्या आईवडिलांना अर्पण केले आहे. प.सि. काणे या ऋषितुल्य व्यक्तीचे आशीर्वचन पुस्तकाला मिळणे हे त्यांचे अहोभाग्य.डॉ गोविंद कासट सर, डॉ माणिकताई पाटील ,प्रा कल्पनाताई देशमुख अशा दिग्जजानी दिलेले आशीर्वाद ,सदिच्छा पाहून जगदिशजी समाजातील प्रत्येक क्षेत्रातील
व्यक्तीशी जवळीक साधून आहेत हे लक्ष्यात येते. कार्यक्रमाचे संचालन आपल्या परिचयाचे मा. डॉ. ऍड सुरेश चापोरकर करणार आहेत. केंव्हाही पटकन मदत करणारे, व बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या चापोरकर सरांबद्दल सांगावे तितके थोडे!
आज ह्या कार्यक्रमाविषयी लिहितांना माझीच परीक्षा होते आहे अशी माझी भावना आहे. ती चूकही नाही. कारण श्री जगदिशजींच्या ह्या कार्यक्रमांसाठी व्यासपीठावर उपस्थित असणारी प्रत्येक व्यक्ती स्वतःचे वैशिष्ट्यांचे अलंकार लेवून इथे विराजमान होणार आहे. प्रत्येकाबद्दल माझ्या मनात आदर भावना आहे. प्रा श्री अनंत मराठे,दै हिंदूस्थांनचे प्रबंध संपादक श्री विलास मराठे, डॉ गोविंद कासट प्रा कल्पनाताई देशमुख सन्माननीय समाजसेवक व उद्योगपती श्री सुदर्शनजी गांग आणि मा. डि.आर. देशमुख असे सगळे मान्यवर विशेष अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित असतील..सोबतीला शब्दप्रभु मासिकाचे संपादक मा. श्री गोपाल उताणे असणार आहेत.त्यामुळे हा प्रकाशनाचा गोवर्धनरूपी मंगल सोहळा सहज सुंदर होणार यात शंका नाही.
श्री जगदीशजींना वाढदिवसाच्या व पुस्तक प्रकाशनाच्या मनापासून खूप भरभरून शुभेच्छा!
रसिकहो चलतायं न तुम्हीसुद्धा? आज दुपारी ठीक ३ वाजता जोग चौकात जोशी हॉलमध्ये ?
जरा विसावू या वळणावर ह्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला ?
प्रतिभा पिटके
अमरावती
९४२१८२८४१३
