*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ. शैलजा करोडे लिखित अप्रतिम कथा*
तेरी मेरी प्रेमकहानी
—————————
सूर्य मावळतीला गेला आहे . चोहीकडे संधीप्रकाश पसरला आहे . डिसेंबर महिना असल्याने हुडहुडी भरवणार्या थंडीने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला सुरूवात केली आहे .शहराबाहेर फारशी वर्दळ नसणार्या व्यसनमुक्ती केंद्राच्या कार्यालयात मी माझे बाबा , आई व आमच्या दोन कुटुंब हिंतचिंतकासह बसलेली आहे . दिव्याच्या अगदी मिणमिण प्रकाशात अंधुकसा अंधार जणू अंगावर येत आहे.
गेल्या वर्षभरापासून या केंद्रात पुनर्वसनासाठी भरती असलेल्या माझ्या नवर्याला आज डिस्चार्ज मिळणार म्हणून आम्ही सगळे जमलेलो . बाबा कार्यालयीन पूर्ततेत गुंतले होते . पत्नी म्हणून माझ्या नवर्याला मी सोडवून नेऊ शकत असल्याने आम्ही हे पाऊल उचललेले .
” मॅडम , या लेटरवर सही करा ”
मी सही केली .अक्षय माझ्या नवर्यासह पुनर्वसन केंद्राला आम्ही बाय करून निघालो .
सावित्री तू होतीस म्हणूनच मी जगू शकलो .तू नवजीवन दिलं आहेस मला .आता तुला सावित्री याच नावानं मी हाक देत जाईन .
“अक्षय , कितीही अडथळे आले तरी आपलं प्रेम अक्षय आहे ,ते कधीच संपणार नाही .”
O my love . म्हणत अक्षयने एक प्रेमळ कटाक्ष माझ्याकडे ठाकला .
आज कशा अवस्थेतून मी त्याला सोडवलं होतं .? कोणत्या अशा शक्ती होत्या कि ज्यांनी व अक्षयमध्ये दुरावा निर्माण केला होता ?.कशी सांगणार ही कथा दोन शब्दात .” तेरी मेरी प्रेमकहानी है बडी मुश्कील , दो लब्जों मे ये बया ना हो पाए ”
” अक्षयचं स्थळ माझ्यासाठी सांगून आलेलं. घरची गरीब परिस्थिती , पण मुलगा डाॅक्टर असल्याने बाबांनी स्थळाला होकार कळवला .
” बाबा , हा डाॅक्टर आहे . दारू पित असेल तर ,” माझी शंका .
” बाबांनी सरळ मुद्यालाच हात घेतला . अक्षय दारू पित होता , पण पिणार नाही शपथेवर बोलला .
लग्नानंतर सुरूवातीचे दोन /चार वर्ष चांगले गेले . माझ्या घरात प्रथमेश चिमणा ही आला . घर कसं आनंदानं भरलं .
हळूहळू अक्षयने रंग दाखवायला सुरूवात केली . रात्री बेरात्री उशीरा घरी येणंं , पार्ट्यांमधून दारू पिऊन येणं सुरू झालं . मी विरोध करताच , चारचौघात तसं वागावं लागतं .माझ्या व्यवसायाचा तो एक भाग आहे म्हणायचा .”
अक्षयचे नातेवाईकही पैशांना लोचणारे होते . याचं लग्न आम्ही करायलाच नको होतं इथपर्यंत यांची मजाल गेलेली . अक्षयला चुकीचे सल्ले देणं , त्याच्यात व माझ्यात दुरावा निर्माण करणं सुरू झालं .
अक्षय तसा imotional fool होता . हलक्या कानाचा होता .त्यांच्या आडसट्यात तो वाहवत गेला .त्यातचं त्याच्याच हाॅस्पिटलमधील विधवा डाॅक्टर त्याच्यावर प्रेमजाळं टाकत होती .
चारी बाजूंनी मला नेस्तनाभूत करण्यात ही मंडळी यशस्वी झाली . अक्षय दुरावला .वहिनीच्या अंकित असलेला अक्षय तिच्या हातचं बाहुलं झाला . अक्षयचं दारूचं व्यसन तिनं नवर्याच्या मदतीनं वाढवलं .आणि दारूच्या नशेत अक्षयचं घर , बँक बँलन्स , शेअर्स , विमा , कॅश सगळं सगळं हडप केलं . सगळं लुटून झाल्यावर , ” निघ आमच्या घरातून म्हणत अक्षरशः त्याचं सामान फेकलं .अक्षयने विरोध करताच त्याला जबर मारहाण केली व या व्यसनमुक्ती केंद्राची मदत घेऊन , त्यांना खोटंनाटं सांगत त्याची रवानगी इथे केली .
वर्षभर या केंद्रात खितपत पडल्यावर आज मी याची सुटका केलेली .
राम सीतेसारखा चौदा वर्षाचा माझा वनवास आज संपला होता .अक्षरशः मरणाच्या दारातून मी अक्षयला आणलं होतं .माझ्या मंगळसूत्रात व भाळावरच्या कुंकवाच्या शक्तीनेच तो माझ्यापर्यंत पुन्हा पोचला होता .कितीतरी वर्षाने नववर्ष माझ्या जीवनात आनंद घेऊन आलं होतं.
“काय सावित्री काय म्हणतेस ” ” आज आपलं प्रेम जिंकलं अक्षय ” ” होय , तुझ्या प्रेमात ती शक्ती आहेच ” FM Radio वर गाणे सुरू होते.
” तेरी मेरी प्रेमकहानी है बडी मुश्कील
दो लब्जों मे ये बया ना हो पाए ”
————————————
शैलजा करोडे ©®
नेरूळ नवी मुंबई
मो.9764808391
