वाहतूक मार्गात बदल
सिंधुदुर्गनगरी
कसाल एन एच-66 रस्त्यावरील आरयूबीकडे मुंबई-गोवा लेनवर हाईट गेजचे दोन कॉलम व टॉप बीम बदलण्याचे काम 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते 1 वाजल्यादरम्यान सरू राहणार आहे. तरी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबई-गोवा लेनवरील वाहतुक गोवा – मुंबई याएकाच लेनवरुन म्हणजे कसाल –बेळणे ब्रिज वरुन गोवा करीता येवून एक मार्गीकेवर वळवून यापुढे गोवा-मुंबई लेनवरील वाहतुक हॉटेल साई माऊली कसाल कुंदे फाटा दुतर्फा मार्गावरून वळविण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
नागरीकांच्या सुविधेसाठी उपविभागीय अभियंता, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 सावंतवाडी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस मदत केंद्र कणकवली,कसाल, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतुक शाखा यांनी मोटार वाहन कायदा 1988 कलम 166 नुसार वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला रस्ता व पर्यायी वाहतूक मार्ग लोकाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी दिशादर्शक फलक, वाहतूक संकेत चिन्हे लोकांना समजेल अशा भाषेत लावण्याची किंवा उभारण्याची कार्यवाही करावी आणि वाहतुक पोलीस व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी या मार्गावर दिनांक 23 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजल्यादरम्यान वाहतूक कोंडी, अपघात होणार नाही, याबाबत वाहतुकीचे नियमन करण्यात यावे,असेही आदेशात नमूद आहे.
