You are currently viewing बावशी येथील इच्छापूर्ती  गणेश मंदिरात श्री गणेश जन्मोत्सव उत्साहात साजरा

बावशी येथील इच्छापूर्ती  गणेश मंदिरात श्री गणेश जन्मोत्सव उत्साहात साजरा

बावशी येथील इच्छापूर्ती  गणेश मंदिरात श्री गणेश जन्मोत्सव उत्साहात साजरा

Phondaghat

बावशी येथील इच्छापूर्ती श्री गणेश मंदिरामध्ये श्री गणेश जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री गणपतीचा पाळणा तेथील सौभाग्यवती महिलांनी पारंपरिक पद्धतीने गाऊन कार्यक्रमास सुरुवात केली. त्यानंतर श्री गणेश जन्मकथा व भक्तांसाठी गणपती दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

नवस फेड कार्यक्रमानंतर दुपारी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कांडर यांनी विधिवत पूजा करून कार्यक्रमास प्रारंभ केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम यशस्वीपणे पार पडले.

सायंकाळी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर भजने व कीर्तने होणार आहेत. रात्री शिरोली, कोल्हापूर येथील कलाकारांचे सोंगी भजन होणार असून, या भक्तिमय कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आपले मूळ गाव असल्याने सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली. त्यांनी मनोभावे श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी अध्यक्ष श्री. कांडर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व प्रसाद देण्यात आला. “काहीही लागल्यास माझ्याशी संपर्क साधावा,” असे आश्वासन अजित नाडकर्णी यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा