You are currently viewing सावंतवाडीत हिट अँड रनची घटना

सावंतवाडीत हिट अँड रनची घटना

सावंतवाडीत हिट अँड रनची घटना;

सालईवाडा येथील अन्वीता सावंत गंभीर जखमी

सावंतवाडी

रस्त्याने पायी जात असताना पाठीमागून आलेल्या एका अज्ञात भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेत सालईवाडा येथील अन्वीता सावंत या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघातात त्यांच्या कंबरेखालच्या भागाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून पायाला फ्रॅक्चर झाले आहे. अधिक उपचारासाठी त्यांना गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ही घटना काल रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सालईवाडा येथील लक्ष्मी विष्णू कॉम्प्लेक्स परिसरात राहणाऱ्या अन्वीता सावंत रस्त्याने पायी चालत असताना मागून आलेल्या एका वेगवान कारने त्यांना जोरात धडक दिली. अपघातानंतर संबंधित कार चालकाने जखमी महिलेला कोणतीही मदत न करता कारसह घटनास्थळावरून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष अनिल नरवडेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यावेळी सतीश बागवे, लक्ष्मण कदम, रूपा मुद्राळे आणि रवी जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले. जखमीची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना तात्काळ गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. दरम्यान, पोलिसांकडून पसार झालेल्या कार चालकाचा शोध सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा