You are currently viewing बांदा पंचायत समितीसाठी महाविकास आघाडीकडून सौ. ऋतिका नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Oplus_16908288

बांदा पंचायत समितीसाठी महाविकास आघाडीकडून सौ. ऋतिका नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सावंतवाडी/बांदा : बांदा पंचायत समिती निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून सौ. ऋतिका संदेश नाईक यांनी आज अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर यांच्यासह राजदीप पावसकर, ओंकार नाडकर्णी, गिरीश भोगले तसेच संदेश नाईक आदी उपस्थित होते.

बांदा पंचायत समिती मतदारसंघावर सध्या भाजपाची सत्ता असून, ही जागा महिला खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मराठा समाजातील उमेदवार देत निवडणूक रिंगणात उतरून राजकीय चुरस निर्माण केली आहे.

सौ. ऋतिका संदेश नाईक यांच्या उमेदवारीमुळे येथील निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यांच्या विरोधात महायुतीकडून सौ. रुपाली शिरसाट या निवडणूक रिंगणात असून, त्यामुळे बांदा पंचायत समिती मतदारसंघात थेट लढतीची शक्यता बळावली आहे.

या घडामोडींमुळे बांदा परिसरात राजकीय वातावरण तापले असून, आगामी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा