You are currently viewing जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी निरीक्षकांची नियुक्ती

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी निरीक्षकांची नियुक्ती

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी निरीक्षकांची नियुक्ती

सिंधुदुर्गनगरी 

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक  निवडणूक प्रक्रिया पारदर्शकमुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगमुंबई यांच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्तकोकण विभाग यांच्याकडून निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी प्रतिभा वराळे यांनी दिली आहे.

यामध्ये शंकर बर्गेअपर जिल्हाधिकारी  तथा अध्यक्षजात पडताळणी समितीरत्नागिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते वैभववाडीकणकवलीदेवगड व मालवण या तालुक्यांसाठी निरीक्षक म्हणून काम पाहणार असून त्यांचा संपर्क क्रमांक  9579735559 असा आहे.

तसेच इब्राहिम चौधरीअपर जिल्हाधिकारीमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमुंबई यांची नियुक्ती कुडाळवेंगुर्लासावंतवाडी व दोडामार्ग या तालुक्यांसाठी निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 9881794221 असा आहे.

नियुक्त निरीक्षक निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणीमतदान व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक निरीक्षण करणार आहेत. नागरिकांनी कोणत्याही तक्रारी किंवा निवडणूकविषयक बाबींसाठी संबंधित निरीक्षकांशी संपर्क साधावाअसे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा