दिविजा वृद्धाश्रमात २६ जानेवारी रोजी विशेष सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन
असलदे – कणकवली
दिविजा वृद्धाश्रम, असलदे येथे २६ जानेवारी रोजी सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि आनंदाचे वातावरण निर्माण करणाऱ्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.०० वाजता झेंडावंदनाने होणार असून त्यानंतर सकाळी ९.०० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११.०० वाजता सत्यनारायण पूजा होणार असून दुपारी १.०० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ७.०० वाजता बक्षीस समारंभ पार पडणार असून त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता दिंडी भजन कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमांद्वारे वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसह परिसरातील नागरिकांना आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक आनंद देण्याचा उद्देश आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन दिविजा वृद्धाश्रमाच्या वतीने करण्यात आले आहे.
