चार दिवसांत ९५ अर्ज विक्री; दोडामार्गमध्ये शेवटच्या दिवशी चुरशीची शक्यता
दोडामार्ग
दोडामार्ग जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या चौथ्या दिवसाअखेर तब्बल ९५ अर्जांची विक्री झाली असली, तरी अद्याप एकाही उमेदवाराने आपले नामनिर्देशन पत्र दाखल केलेले नाही. यामुळे आता शेवटच्या दिवशी अर्जांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.मात्र राजकीय पक्ष पदाधिकारी आपल्याला उमेदवारी मिळावी नाहीतर दुसरी कडे पक्षातर करण्याच्या हालचालीना वेग आला आहे
आज चौथ्या दिवसापर्यंतची स्थिती
निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून १६ जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, पहिल्या चार दिवसांत प्रशासनाकडे एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. तहसीलदार राहुल गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्ज विक्रीचा आकडा मात्र दिवसागणिक वाढत आहे एकही अर्ज भरला नाही
पहिला दिवस १० अर्ज,दुसरा दिवस १८ अर्ज,तिसरा दिवस: ३८ अर्ज
चौथा दिवस २९ अर्ज असे मिळून
एकूण विक्री केलेल्या नामनिर्देशन पत्रे सख्या 95 झाली आहे
शेवटच्या दिवशी चुरस वाढणार
नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यासाठी २१ जानेवारी हा शेवटचा दिवस आहे. आता केवळ एकच दिवस शिल्लक राहिल्याने इच्छुकांची आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होणार हे निश्चित आहे. बहुतांश उमेदवार शेवटच्या दिवशी, शुभ मुहूर्त पाहून किंवा रणनीतीचा भाग म्हणून अर्ज दाखल करण्याला पसंती देतात, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.
”उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २१ जानेवारी हा शेवटचा दिवस असल्याने प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. चौथ्या दिवसापर्यंत ९५ अर्जांची विक्री झाली असून उद्या मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.”
शेवटच्या दिवशी कार्यकर्ते पदाधिकारी फॉर्म भरणे कागदपत्रे गोळा करताना गर्दी होणार आहे
