फोंडाघाटचे डॉ. सुरेश आपटे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
कणकवली
काल झालेल्या DFC सिंधुदुर्ग तसेच वर्किंग कमिटी कणकवली जल्लोष कार्यक्रमात फोंडाघाट येथील प्रसिद्ध व निष्णात डॉक्टर डॉ. सुरेश आपटे यांना त्यांच्या उत्कृष्ट वैद्यकीय सेवेसाठी शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. आपटे यांनी अनेक वर्षे प्रामाणिकपणे व सेवाभावी वृत्तीने रुग्णसेवा केल्यामुळे फोंडाघाट परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्या कार्याबद्दल मोठा आदर आहे. त्यांच्या या सन्मानामुळे संपूर्ण फोंडाघाट वासियांना अभिमान वाटत आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, डॉ. सुरेश आपटे यांचा मुलगा डॉ. शैलेंद्र आपटे हेसुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तितक्याच प्रामाणिकपणे वैद्यकीय सेवा देत आहेत, ही बाब विशेष अभिमानास्पद आहे.
नाडकर्णी कुटुंबियांच्या वतीने डॉ. सुरेश आपटे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांना उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थना ईश्वरचरणी करण्यात आली आहे.
