वृत्तसंस्था:
7th CPC Latest News:मोदी सरकारने लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या हितामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने फॅमिली पेन्शन भरण्याच्या नियमांमध्ये सुधारणा करताना फॅमिली पेन्शन भरणा मर्यादा ४५ हजार रूपयांवरून वाढवून १,२५,००० रूपये प्रति महिना केली आहे. याची माहिती केंद्रीय राज्य मंत्री जितेंद्र सिंग यांनी दिली. ते म्हणाले, फॅमिली पेन्शनमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.याची भरणा मर्यादा ४५ हजार रूपयांवरून वाढवून दर महिन्याला १,२५,००० रूपये प्रति महिना करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे आयुष्य सोपे होईल आणि त्यांना पर्याप्त आर्थिक सुरक्षा मिळेल.
डॉ.सिंग म्हणाले, पेन्शन अथवा पेन्शनर कल्याण विभागने या रकमेप्रकणात स्पष्टीकरण जाहीर केले आहे. यात आपल्या आई-वडिलांच्या निधनानंतर कोणत्याही मुलाला फॅमिली पेन्शनमधून दोन हप्ते मिळवण्याचा अधिकार असतो. डॉ. सिंग म्हणाल, आता दोन हप्त्यांची एकूण रक्कम १,२५,०००पेक्षा जास्त असता कामा नये.
फॅमिली पेन्शनचा जुना नियम
केंद्रीय सिव्हिल सेवा नियम १९७२च्या नियम ५४च्या उपनियम ११नुसार जर पती आणि पत्नी दोघेही सरकारी नोकरीमध्ये असतील आणि या नियमांतर्गत येत असतील तर त्यांच्या मृ्त्यूपश्चात त्यांच्या मुलाला फॅमिली पेन्शनमधील दोन हप्ते मिळवण्याचा अधिकार आहे. याआधी या नियमांतर्गत फॅमिली पेन्शनमधील दोन हप्त्यांची रक्कम १,२५,०० पेक्षा दास्त असता कामा नये.
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केली सुधारणा
सातव्या वेतन आयोगानुसार अधिकाधिक वेतन वाढवून प्रति महिना २,५०,००० रूपये इतकी करण्यात आली आहे. तर केंद्रीय सिव्हिल सेवाच्या पेन्शनच्या नियमानुसार ही रक्कम २.५०.००० रूपयांचे ५० ट्के म्हणजेच १,२५,००० रूपये आणि २,५०,००० रूपयांचे ३० टक्के म्हणजेच ७५ हजार रूपये इतकी ठरवण्यात आली आहे.