*राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत नील बांदेकर प्रथम*
सावंतवाडी
मुंबई येथील अष्टपैलू संस्कृती प्रतिष्ठान, आयोजित नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत जवाहर नवोदय विद्यालय सांगेली येथील इयत्ता सातवी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु. नील नितीन बांदेकर याने संपूर्ण राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.
या स्पर्धेत संपूर्ण राज्यभरातून शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.या सर्व विद्यार्थ्यांमध्ये आपल्या उत्कृष्ट निबंध लेखन शैलीच्या जोरावर नील बांदेकर राज्यात प्रथम क्रमांक मिळवत विजयी झाला.
यापूर्वीही नीलने राज्यस्तरीय वेशभूषा,कथाकथन,वक्तृत्व, निबंध, मॉडेलिंग, गीत गायन, चित्रकला अशा अनेक स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
नीलच्या यशात आई सौ. गौरी बांदेकर आणि वडील नितीन बांदेकर यांचे त अनमोल असे मार्गदर्शन लाभले आहे.
विविध स्तरातून नीलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
