You are currently viewing मुंबई महापालिकेत भाजपचा दणदणीत विजय; मंत्री नितेश राणेंकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन
Oplus_16908288

मुंबई महापालिकेत भाजपचा दणदणीत विजय; मंत्री नितेश राणेंकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन

मुंबई :

राज्यात मुंबईसह बहुसंख्य महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. या यशानंतर राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

मुंबई महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता खिळखिळी करत भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता स्थापन झाल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अभिनंदन केले. भाजपच्या संघटनशक्तीचा आणि सक्षम नेतृत्वाचा हा विजय असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

या प्रसंगी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह पक्षाचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा