मराठी राजभाषा दिनानिमित्त जिल्हास्तरीय खुली स्वरचित मराठी काव्यवाचन स्पर्धा
मालवण
मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा तर्फेजिल्हास्तरीय खुली स्वरचित मराठी काव्यवाचन स्पर्धेचेशुक्रवार दि.२७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ठीक २. ३० वाजता* आयोजन करण्यात आले आहे. . हि स्पर्धा श्रीम.रजनी ठाकूर (आचरा ), कै.सुधाकर आचरेकर (आचरा ), श्रीम.भावना मुणगेकर (मुंबई ), श्री. प्रसाद रेडकर (मुंबई ), श्रीम.मिथिला नेरुरकर (पुणे) यांनी प्रायोजित केलेलि असून. १८ वर्षावरील व्यक्तींसाठी खुली आहे.
यासाठी बक्षिसे प्रथम क्रमांक -१०००/- द्वितीय क्रमांक -७००/- तृतीय क्रमांक -५००/-,
उत्तेजनार्थ २ बक्षिसे – प्रत्येकी २५०/- रुपयांची आहेत. या स्पर्धेसाठी
कविता स्वरचित मराठी किंवा मालवणी बोली भाषेतील असावी.कविता दीर्घ नसावी. सादरीकरण अवधी ३ ते ५ मिनिटे.दुसऱ्याचे वाडं:मय चौर्य (Copy Right) केल्यास स्पर्धक कठोर शिक्षेस पात्र होईल. कवितेमध्ये राजकीय विडंबन व अश्लीलता असू नये.एका स्पर्धकाला एकच कविता वाचता येईल.स्पर्धकाने आपल्या कविता दि. २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत सकाळी १० ते २ वाजेपर्यंत संस्थेत जमा करायच्या आहेत.प्रथम येणाऱ्या फक्त १५ स्पर्धकांना प्रवेश असून अधिक माहितीसाठी ग्रंथपाल सौ.विनिता कांबळी यांच्याशी ०२३६५-२४६०१७ किंवा ९४२१२६३३४६ यावर संस्थेच्या कामकाजाच्या वेळेत (सकाळी १० ते ४ ) यावेळेत संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे,, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर यांनी केले आहे.
