You are currently viewing पानगळ

पानगळ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पानगळ*

🍂🍂🍂🍂🍂

 

निसर्गाच्या नियमाने

झाली सुरु पानगळ

शिशिरात खच पडे

दिसेचना वृक्षतळ।।

 

जीर्ण झाली पाने सारी

देठ आता सुकलेले

येता झोत वा-यासवे

पान अलगद गळे।।

 

घेती जागा नवपर्ण

कोंब तांबडे कोवळे

पाने सुकली हलकी

तप्त उन्हातच जळे।।

 

नियोजन निसर्गाचे

बदलती ऋतू सारे

जुने जाऊनी नव्याचे

स्वागतास सूर्य तारे।।

 

देऊ निरोप तयांना

कृतज्ञता भाव मनी

सावलीत ठेवलेस

उपकार ठेऊ ध्यानी।।

🍂🍂🍂🍂🍂🍂🍂~~~~~~~~~~~~~

अरुणा दुद्दलवार

दिग्रस यवतमाळ🌹✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा