*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नक्षत्रांच गणित*
‘जेष्ठात’ आल्या ‘रोहिण्या ‘
चार दिसाच्या पाहूण्या
बळीराजा पाहे वाट
‘मृगाचा’ राहे थाटमाट
पाठीमागून ते आले
‘आद्रा’ अन् ‘पुनर्वसू ‘
बळीराजाच्या दिलात
धकधक अन् डोळ्यात आसू
‘आषाढात’ आला ‘पुष्य ‘
बळीराजा करी भाष्य
येईल वरूण राजा
भरेल जोमाने शेष
बघा वळून आले ‘आश्लेषा ‘
बळीराजाच्या वाढल्या आशा
नदी-नाले वाहतील भरून
शेतं पिक वाढतील तरारून
‘श्रावणाच्या’ आल्या सरी
‘मघा’ ‘पुर्वा’ अधूनमधून
ऊन-सावलीचा खेळ करी
‘भादव्यात’ येतो भरून राहून राहून
‘उत्तरात’ पडे प्रश्न
आता होते कडक ऊन
मग तळे भरले कुठून?
प्रश्न सोपा बिरबलाचा
कोडे पडले अकबराला
उत्तर शोधावे कुठून
सत्तावीस वजा नऊ बरोबर शुन्य
२७ – ९ = ०
गणित सोडवा विचार करून
गणित दाखवा सोडवून
गणित दाखवा सोडवून
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर,धुळे.*
7588318543.
