You are currently viewing चंद्रहास उर्फ बबली राणे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री प्रकाश गायकवाड यांची सदिच्छा भेट

चंद्रहास उर्फ बबली राणे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री प्रकाश गायकवाड यांची सदिच्छा भेट

चंद्रहास उर्फ बबली राणे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री प्रकाश गायकवाड यांची सदिच्छा भेट

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जावई तसेच मोठ्या भावाप्रमाणे कायम साथ देणारे आमचे परममित्र श्री. प्रकाश गायकवाड साहेब यांनी खास पुण्याहून येऊन श्री. चंद्रहास उर्फ बबली राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी चंद्रहास राणे यांना वाढदिवसानिमित्त पुष्पहार व पेढे देऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या भेटीदरम्यान आपुलकीचे वातावरण पाहायला मिळाले. नेहमीच कुटुंबाप्रमाणे साथ देणाऱ्या श्री. प्रकाश गायकवाड साहेब यांच्या प्रेमळ भेटीमुळे वाढदिवस अधिकच खास झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या प्रेमळ शुभेच्छा व स्नेहाबद्दल सौ. चंदना चंद्रहास राणे व श्री. चंद्रहास राणे यांनी श्री. प्रकाश गायकवाड साहेब यांचे मनापासून जाहीर आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा