ओसरगाव पंचायत समिती निवडणुकीसाठी सौ. चंदना चंद्रहास राणे इच्छुक
कणकवली
ओसरगाव परिसरात येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीसाठी सौ. चंदना चंद्रहास राणे यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राजकीय संधी मिळाल्यास प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ही निवडणूक लढवण्याचा त्यांचा ठाम निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांचे पती श्री. चंद्रहास उर्फ बबली राणे हे गेल्या कित्येक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. मात्र आरक्षणामुळे त्यांना थेट निवडणुकीची संधी मिळू शकली नाही. तरीही त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी सातत्याने योगदान दिले आहे.
पतीच्या या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेऊन, त्यांच्या कार्याला पुढे नेण्याच्या उद्देशाने सौ. चंदना राणे यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. “जनतेच्या समस्या, विकासकामे आणि सामाजिक बांधिलकी यासाठी काम करण्याची संधी मिळावी, हीच माझी भूमिका आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
स्थानिक पातळीवर त्यांच्या या निर्णयाची चर्चा सुरू असून, आगामी पंचायत समिती निवडणुकीत त्या कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
